दापोडी कार्यशाळेत एमएस बसची निर्मिती

पिंपरी-राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेत तयार झालेली एम एस बस एसटी महामंडळाच्या सेवेत दाखल झाली आहे. या कार्यशाळेत बांधणी करण्यात आलेली ही बस एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागाच्या बस ताफ्यात दाखल होण्यासाठी मंगळवारी (दि.29) दापोडीतुन रवाना झाली.
यावेळी कार्यशाळा व्यवस्थापक आर. जी. कांबळे, उपअभियंता कोलारकर, उत्पादन अधीक्षक चिकोर्डे, कोच अधीक्षक पाटील, सिनिअर अकाउंट ऑफिसर जगताप, चंद्रकांत चव्हाण, उपअधीक्षक ढावरे, रजपूत, पोटे, गिरी, डॉ. इनामदार, झिलपिलवार, युनियन प्रतिनिधी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

आकर्षक रंगसंगती असणारी एम एस बस आतून देखील तेवढीच आकर्षक आणि आरामदायी आहे. ही बस प्रवाशांना साध्या प्रवासी भाड्याच्या दारात उपलब्ध होणार आहे. बैठक व्यवस्था आरामदायक आहे. या बसला रूट बोर्ड बसविण्यात आला आहे. यामुळे ही बस कुठपासून ते कुठपर्यंत प्रवास करणार आहे, याची संपूर्ण माहिती प्रवाशांना मिळणार आहे.

बसमध्ये सुस्पष्ट माईक सिस्टम बसविण्यात आली आहे. प्रवाशांना इच्छित स्थळी उतरण्यासाठी याचा मोठा फायदा होणार आहे. अनेकदा बसमध्ये जास्त गर्दी झाल्यास प्रवाशांना उभे राहण्यासदेखील जागा मिळत नाही. एम एस बसमध्ये उभे राहण्यासही मोठी जागा ठेवण्यात आली आहे. सर्व प्रकारे अत्याधुनिक आणि प्रवाशांसाठी आरामदायी बस औरंगाबाद विभागाच्या ताफ्यात दाखल करण्यात आली आहे. ही बस प्रवाशांच्या पसंतीस उतरेल, असा विश्‍वास कार्यशाळा व्यवस्थापक आर.जी. कांबळे यांनी व्यक्‍त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)