दापोडी कार्यशाळेत एमएस बसची निर्मिती

पिंपरी – राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेत बांधणी झालेली एमएस बस एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागाच्या बस ताफ्यात दाखल होण्यासाठी मंगळवार दि. 29 ला दापोडीतून रवाना झाली.

यावेळी कार्यशाळा व्यवस्थापक आर. जी. कांबळे, उप अभियंता कोलारकर, उत्पादन अधीक्षक चिकोर्डे, कोच अधीक्षक पाटील, सिनिअर अकाउंट ऑफिसर जगताप, चंद्रकांत चव्हाण, उप अधीक्षक ढावरे, रजपूत, पोटे, गिरी, डॉ. इनामदार, झिलपिलवार, युनियन प्रतिनिधी व कर्मचारी उपस्थित होते.

बाहेरून आकर्षक रंगसंगती असणारी एमएस बस आतूनही तेवढीच आकर्षक आणि आरामदायी आहे. ही बस प्रवाशांना साध्या प्रवासी भाड्याच्या दारात उपलब्ध होणार आहे. या बसला रूट बोर्ड बसवण्यात आला आहे. यामुळे ही बस कुठपासून ते कुठपर्यंत प्रवास करणार आहे, याची संपूर्ण माहिती प्रवाशांना मिळणार आहे.

बसमध्ये सुस्पष्ट माईक सिस्टम बसवण्यात आली आहे. प्रवाशांना इच्छित स्थळी उतरण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. अनेकदा बसमध्ये जास्त गर्दी झाल्यास प्रवाशांना उभे राहण्यास देखील जागा मिळत नाही. एमएस बसमध्ये उभे राहण्यासही मोठी जागा आहे. ही बस प्रवाशांच्या पसंतीस उतरेल, असा विश्‍वास कार्यशाळा व्यवस्थापक आर. जी. कांबळे यांनी व्यक्‍त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)