दापोडीत महिलेची आत्महत्या

पिंपरी – आजारपणाला कंटाळून महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दापोडी येथे शनिवारी (दि. 12) दुपारी घडली.

भैरवी गणपतराम चौधरी (वय-47, रा. दापोडी. मूळगाव राजस्थान) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भैरवी या गेल्या आठवड्यापासून आजारी होत्या. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. शनिवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास त्यांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी मुलगा घरी आला. मी हात-पाय धुवून येते, असे भैरवी यांनी मुलाला सांगितले. यामुळे मुलगा दुचाकीवर वाट पाहात थांबला होता. 15 मिनीट होऊनही आई न आल्याने तो तिला बोलविण्यासाठी घरी गेला. त्यावेळी भैरवी यांनी लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. मुलाने त्वरित आईला खाली उतरवून रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)