दापोडीत दोन गटात हाणामारी

पिंपरी – किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचे रूपांतर दोन गटातील हाणामारीमध्ये झाले. या भांडणात एकमेकांवर तलवार, कोयत्याने हल्ले चढवून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. ही घटना दापोडी परिसरात गुरुवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी खुनी हल्ल्याचा परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजय मोरे, विजय वाल्मिके, सागर वाल्मिके, दीपक वाल्मिके व इतर तीनजण (नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. जय ऊर्फ केट्या आनंद भिसे (वय-19, रा. एसएमएस कॉलनी, दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास फिर्यादी भिसे यांचा मित्र आणि गणेश अडागळे यांच्यात भांडणे सुरू होती. भिसे त्याठिकाणी थांबले असता आरोपींनी त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने पाठीमागून कोयता मारला. तर आरोपींनी तलवारीने वार केले. भिसे हे जीव वाचवून पळून गेले. आरोपींनी फिरोज शेख यांच्या घरात घुसून त्यांच्या पत्नीला लाथा बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. तसेच रमझान शेख यांची आई जुबेदा यांच्या घरात घुसून साहित्याची तोडफोड केली.

तर दुसऱ्या गटाकडून सागर दीपक वाल्मिके (वय-16, रा. सिद्धार्थनगर, दापोडी) याने फिर्याद दिली आहे. बा ऊर्फ फिरोज दिलाज शेख (वय 36), रमझान इस्माईल शेख (वय 25), ताज इस्माईल शेख (वय 22), केट्या ऊर्फ जय भिसे (वय 19, सर्व रा. गुलाबनगर, दापोडी), व अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)