दापोडीत तासभर रास्ता रोको

पिंपरी – दापोडी परिसरातील पाणी पुरवठा गेल्या दीड वर्षांपासून विस्कळीत आहे. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी नागरिकांसह सुमारे तासभर रास्ता रोको केला. पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. आम्ही विरोधी पक्षाचे नगरसेवक असल्याने जाणीवपूर्वक कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी यावेळी केला.

दापोडी येथे बुधवारी (दि. 5) दुपारी साडेतीनच्या सुमारास आंदोलन झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक रोहीत काटे, राजू बनसोडे, नगरसेविका माई काटे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

-Ads-

गेल्या दीड वर्षांपासून दापोडी परिसरातील पाणी पुरवठा विस्कळीत आहे. आठ-आठ दिवस पाणी येत नाही. पाणी आले तरी अत्यंत कमी दाबाने येत आहे. आम्ही तीनही नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे असल्याने जाणीवपूर्वक कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जात आहे. विनाकारण नागरिकांना वेठीस धरले जात आहे, असा आरोप नगरसेवकांनी केला. तसेच पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांना आंदोलकांनी घेराव घातला. मात्र यावर प्रशासनाने हा तांत्रीक बिघाड नसून जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरु आहे. बुधवारी सकाळी पिंपळे गुरव, वैदुवस्ती, सुदर्शननगर, दापोडी, सांगवी, नवी सांगवी भागात कमी दाबाने झाला आहे, असे प्रशासानाने सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)