दापोडीत कारची तोडफोड

पिंपरी- किरकोळ करणाहून झालेल्या वादातून तरुणास दगडाने मारहाण करून कारची तोडफोड करण्यात आली. ही घटना सोमवारी (दि. 5) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दापोडी परिसरात घडली. या प्रकरणी कैलास दशरथ गेंगजे (23, रा. साई अपार्टमेंट, पिंपळे गुरव ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्वप्नील भोई यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गेंगजे आणि त्यांचा मित्र कारने जात असताना आरोपींनी किरकोळ करणाहून वाद घालत त्यांना दगडाने मारहाण केली. तसेच त्यांच्या कारची तोडफोड करून नुकसान केले. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)