“सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यात इतके विक्रमी खड्डे झाले आहेत की ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये आता दखल घ्यावी लागेल. रस्ते दुरुस्तीवर मागील 4 वर्षात खर्च केलेले हजारो कोटी रुपये नेमके कोणाच्या खिशात गेले ?”, असा प्रश्न काहीदिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला होता. रस्त्यावरील खाड्यांवरून राष्टवादीने भाजप सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक कार्टून शेयर करण्यात आले आहे. ज्यामध्ये यमदेव आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचा संवाद दाखवला आहे. यमदेव चंद्रकांत पाटील यांना धन्यवाद म्हणत आहे. “दादा तुमचे खूप खूप आभार! तुम्ही खड्यांकडे अक्षम दुर्लक्ष केल्यामुळे आमचं काम सोपं झालं” यावर चंद्रकांत पाटील यांनी ते तर माझं कर्तव्यच असल्याचे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)