दादासाहेब हुलगे यांना राज्यस्तरीय यशवंतरत्न पुरस्कार जाहीर

बिदाल – राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ओबीसी सेलचे राज्य सरचिटणीस दादासाहेब हुलगे यांना बिड येथील जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठान तर्फे राजे यशवंतराव होळकर राज्यस्तरीय यशवंतरत्न पुस्कार नुकताच जाहीर झाला. गोर-गरीब जनतेसाठी सतत झटणारा संघर्षयात्री म्हणूनच जनमाणसात परिचित असलेले व्यक्तिमत्त्व आहे.

धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्‍नासाठी समाज जागृतीचे काम तळमळीने आहे.त्याचबरोबर पुण्यश्‍लोक अहिल्या फांऊडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील कामगिरीची दखल घेऊन या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आ.प्रकाश शेंडगे,खा.विकास महात्मे,आ.रामराव वडकुते यासह विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)