दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबियांचे राहुल गांधींकडून सांत्वन

तांदुळ संशोधनाकडे देशाचे दुर्लक्ष झाल्याने मागितली माफी
मुंबई – चंद्रपुर जिल्ह्यातील प्रख्यात तांदुळ संशोधक दादाजी खोब्रागडे यांचे नुकतेच निधन झाले. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या चंद्रपुर जिल्ह्यातील नांदेड या गावातील घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. खोब्रागडे यांनी तांदळाच्या एचएमटी व्हरायटीसह अनेक नवीन प्रकार आपल्या संशोधनातून शोधून काढले आहेत. त्यांच्या या महान कार्याकडे देशाचे दुर्लक्ष झाल्याबद्दल राहुल गांधी यांनी खंत व्यक्त करीत त्यांच्या कुटुंबियांची माफीही मागीतली आहे.

राहुल गांधी यांनी या भेटीत त्यांच्या तांदुळ संशोधनाच्या कार्याची माहिती घेतली. त्यावेळी त्यांच्या समवेत प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील. राष्ट्रीय सरचिटणीस अशोक गहलोत हेही उपस्थित होते. या भेटीनंतर राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे की या ज्येष्ठ दलित शेतकऱ्याने खूप कष्टाने तांदळाचे नवीन वाण शोधून काढले. त्यांचे हे संशोधन दुर्लक्षित राहिले. देशाने त्यांच्या कार्याची योग्य दखल घेतली नाहीं त्याबद्दल मी त्यांच्या कुटुंबियांची माफीही मागीतली. 78 वर्षीय खोब्रागडे यांचे गेल्याच महिन्यात दीर्घ आजाराने निधन झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)