दाखल्यांसाठी गर्दीचा “सेतू’

8 हजार 824 जणांना लाभ : पाच महिन्यांची आकडेवारी

पिंपरी – शाळा प्रवेश, शिष्यवृत्ती, नोकरीसाठी उत्पन्नाचा दाखला, घरकूल योजना, रहिवाशी प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर, जातीचे दाखले व आवश्‍यक प्रमाणपत्र आदी महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्‍यकता असते. यासाठी गेले काही दिवस पिंपरी-चिंचवडच्या अपर तहसील कार्यालयाजवळील सेतू कार्यालयात नागरिकांची गर्दी होत असल्याचे सेतू व्यवस्थापक राजेंद्र चव्हाण म्हणाले. ऑन लाईन अर्ज केल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांत दाखला तयार झाल्याचा संदेश नागरिकांना मिळत असल्याने सोयीचे झाले आहे. यंदा 1 एप्रिल ते 31 ऑगस्टपर्यंत नागरिकांनी 5 हजार 861 दाखले जमा केले असून, त्यापैकी 5 हजार 513 दाखल्यांचे वाटप झाले आहे. तर उर्वरीत दाखले देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
यंदा रहिवासी प्रमाणपत्र काढण्यासाठी नागरिकांची संख्या जास्त होती. गेल्या पाच महिन्यांत 1919 रहिवासी प्रमाणपत्रांपैकी 1671 प्रमाणपत्र वाटप केले व 248 प्रमाणपत्रांची प्रक्रिया सुरू आहे. नॉन-क्रिमिलेअरच्या 1793 अर्जापैकी 1320 दाखल्यांचे वाटप केले व इतर दाखले तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.

‘शाळा प्रवेशाच्या वेळी ज्यांना तातडीने उत्पन्नाच्या दाखल्याची गरज असते, त्यांना वेळेत दाखले देण्यासाठी शालेय प्रवेशाच्या दिनांकाच्या चिठ्ठ्या घेऊन त्यांना तातडीने दाखण्याची सुविधा आहे. प्रवेश प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असल्याने गेल्या महिन्यापेक्षा दाखल्यासाठी अर्ज येण्याचे प्रमाण कमी आहे.’
– गितांजली शिर्के, तहसीलदार.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)