दाखलपूर्व समुपदेशनामुळे तीन वर्षाच्या मुलीचे भवितव्य बनले सुरक्षित

वडिलांनी परस्पर संमतीने घेतलेल्या घटस्फोटानंतरही मुलीसाठी स्वत:हून गुंतवणूक करण्याचे केले मान्य


भविष्यात गुंतवणूक वाढवणार


 वाढत्या गरजांना चर्चा करून करणार मदत
 

पुणे – परस्पर संमतीने घटस्फोट घेतल्यानंतर अनेकदा मुलांच्या भवितव्याचा पुरेपूर्ण विचार केला जातोस असे नाही. मात्र, दोघांचे दाखलपूर्व समुपदेशन केल्यास त्यामध्ये बदल होऊ शकतो. घटस्फोट घेऊनही दोघे मुलांच्या भवितव्याचा विचार करू शकतात. कौटुंबिक न्यायालयात नुकताच उच्चशिक्षित दांपत्याचा घटस्फोट झाला. दाखलपूर्व समुदेशनामध्ये दोघांना त्यांच्या तीन वर्षाच्या मुलीच्या भविष्याचा विचार करण्यास लावले. त्यानुसार पतीने घटस्फोटाच्या वेळी पत्नीला 15 लाख रुपये, स्त्रीधनाचे दागिने रुपये दिलेच. मात्र स्वत:हून मुलीच्या भवितव्यासाठी मोठे पाऊल उचलले. त्याने मुलीसाठी दरमहा आठ हजार रुपये म्युच्युल फंडात गुंतवण्याचे मान्य केले आहे. हे पैसे काढण्याचे अधिकार पत्नी आणि मुलीला दिला आहे. पाच वर्षानंतर मुलीच्या नावे दरमहा 15 हजार गुंतवण्याचेही कबुल केले आहे. एवढे करूनही तो थांबला नाही. तर वेळोवेळे मुलीच्या दैनंदिन गरजा आणि शिक्षणासाठी खर्च उदभवल्यास चर्चा करून मदत करण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे मुलीचे भवितव्य सुरक्षित बनले आहे. मुलीचा ताबा आईकडे असणार आहे. मात्र, तो सैन्यदलात आहे. त्याला ज्याप्रमाणे सुट्टी मिळेल. त्याप्रमाणे त्याला मुलीला भेटण्यास, काही दिवस ताबा देण्याचे तिने कबुल केले. कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश सुभाष काफरे यांच्या न्यायालयात नुकताच हा परस्पर संमतीने घटस्फोट झाला. दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. गणेश कवडे यांनी दोघांचे दाखलपूर्व समुपदेशन केले.
माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. दोघांनी 2012 मध्ये आंतरजातीय प्रेमविवाह केला. तो सध्या बेंगलोर येथे नोकरीनिमित्त आहे. ती पुण्यातच आहे. तो मेजर आहे. तर ती गृहिणी आहे. लग्नानंतर काही दिवस त्यांनी व्यवस्थित संसार केला. त्यांना मुलगी झाली. मात्र, त्यानंतर दोघात वैचारिक मतभेद होऊ लगले. त्यातून वाद विकोपाला गेले. त्यातून ऑगस्ट 2016 पासून दोघे वेगळे राहु लागले. दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ऍड. गणेश कवडे यांच्यामार्फत दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दावा दाखल केला. त्यापूर्वी ऍड. कवडे यांनी दोघांचे दाखलपूर्व समुपदेशन केले. त्याविषयी ते म्हणाले, दोघे एकत्र यावेत, यासाठी मी प्रथम प्रयत्न केला. मात्र, मतभेद इतके होते की, एकत्र येऊनही ते सुखाने राहू शकले नसते. त्यामुळे दोघांचा परस्पर संमतीने घटस्फोटाविषयी अर्ज करण्याचे मान्य केले. त्यापूर्वी तीन वर्षाची मुलच्या भवितव्याविषयी विचार करण्यास दोघांना सांगितले. मुलगी दोघांची आहे. तिच्यावर दोघांनी प्रेम केले पाहिजे. पत्नीने सांभाळले. तर पतीने आर्थिक भार उचलला पाहिजे. हे दोघांना पटवून देण्यात यश आले. त्यामुळे पत्नी तिचे पालक असल्याचे मान्य करण्यात आले. त्याने तिच्या भवितव्यासाठी खर्च उचलण्याचे मान्य केले. दाखलपूर्व समुपदेशानामुळे तीन वर्षाच्या मुलीचे भवितव्य सुरक्षित झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)