अबू धाबी – कुख्यात अंडरवर्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या शार्प शूटरला-रशीद मलबारी याला अटक करण्यात आली आहे. छोटा शकील याच्या आदेशानुसार भाजपा नेते वरुण गांधीं आणि श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांना उडवण्यचा आपला डाव होता, मात्र आपला डाव प्रत्यक्षात आणण्यापूर्वीच अटक करण्यात आल्याचे त्यांने पोलीसांना दिलेल्या जबाबात सांगितले आहे.

रशीद मलबारी सन 2014 मध्ये मेंगळुरू कोर्टातून बेल मिळाल्यानंतर नेपाळ मार्गे भारताबाहेर पळाला होता. छोटा शकीलचा तो अगदी खास माणूस समजलो जातो.

दाऊद इब्राहिमच्या चार शार्प शूटर्सनी 15 सप्टेंबर 2000 रोजी बॅंकॉकमधील एका हॉटेलमध्ये छोटा राजनवर हल्ला केला होता. त्यावेळी छोटा राजनला 3 गोळ्या लागूनही तो बचावला होता. त्याला वाचवणाऱ्या रोहित वर्मा याला मात्र 32 गोळ्या लागल्या होत्या. छोटा राजनवर हल्ला करणाऱ्या चार शार्प शूटर्समध्ये एक रशीद हुसेन उर्फ रशीद मलबारी होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)