दाऊदला पकडण्यासाठी भारताला आता अमेरिकेची साथ 

नवी दिल्ली – भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान पहिल्यांदाच झालेल्या २+२ चर्चेने दोन्ही देशांमधील मित्रत्वाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. या चर्चेदरम्यान दहशतवाद्यांच्या माहितीच्या देवाण-घेवाणीबाबत दोन्ही बाजूंकडून एकमत झाले. याशिवाय या चर्चेवेळी आणखी एका मुद्यावर भारताला मोठे यश मिळाले आहे. अमेरिकेने पहिल्यांदाच दाऊद इब्राहिमविरुद्ध भारताला मदत करण्यासाठी सहमती दर्शवली आहे. यामुळे दाऊदला जेरबंद करण्यात भारताला लवकरच यश येईल, अशी अशा व्यक्त करण्यात येत आहे.

गुरुवारी झालेल्या बैठकीत अमेरिकेने पाकिस्तानमध्ये चालू असलेल्या दहशतवादाविरुद्ध भारताला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी पाकिस्तानस्थित अनेक दहशतवादी संघटनाविरुद्ध कारवाई करण्यावर दोन्ही देशांचे एकमत झाले. या संघटनांमध्ये दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीचेही नाव आहे. यामुळे अमेरिका भारताला दाऊदविरोधात कारवाईत मदत करणार आहे. यानुसार दाऊदच्या अमेरिकेत असणाऱ्या मालमत्तांवर अमेरिकेने कारवाई केल्यास याचा मोठा झटका दाऊदला बसू शकतो.

पाकिस्तानी जमिनीचा वापर दहशतवाद्यांकडून अन्य देशांवरील हल्ल्यांसाठी करू दिला जाऊ नये, अशा स्पष्ट सूचनाही यावेळी पाकिस्तानला करण्यात अाली आहे. याशिवाय दोन्ही देशांमध्ये सीमेवरील आतंकवाद, भारताची एनएसजी दावेदारी आणि एच १ बी व्हिजावरही चर्चा झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)