दाऊदच्या डी-कंपनीने पाकमधून जगभरात जाळे पसरविले – अमेरिका

वॉशिंग्टन – भारताने फरार घोषित केलेल्या दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीने पाकिस्तानमधून जगभरात पाय पसरले आहेत. डी-कंपनीने अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी अनेक देशात आपले जाळे तयार केले असून, एक मजबूत संघटना झाली आहे, अशी माहिती जॉर्ज मॅसन युनिव्हर्सिटीमधील प्रोफेसर लुईस शेली यांनी दिली. मेक्‍सिकन ड्रग्ज संघटनांप्रमाणे डी-कंपनीही एकापेक्षा जास्त उद्योग आहेत, असेही त्यांनी सांगितले.

दहशतवाद आणि बेकायदेशीर आर्थिक मदतीवर संसदेच्या आर्थिक सेवा संबंधी समितीकडून आयोजित चर्चेदरम्यान शेली यांनी डी-कंपनीचे जाळे अनेक देशांमध्ये पसरले असल्याचा दावा केला आहे. मेक्‍सिकोमधील अंमली पदार्थ संघटनांप्रमाणे डी-कंपनीचे जाळे वेगवगळ्या देशांमध्ये पसरले आहे. ते हत्यार, बनावट डीव्हीडींची तस्करी करतात आणि हवालाच्या माध्यमातून आर्थिक मदत पुरवण्याचे कामही करतात.

भारतातून पसार झालेला दाऊद इब्राहिम हा डी-कंपनीचा प्रमुख आहे. मुंबईतील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये तो मुख्य आरोपी असून सध्या पाकिस्तानात लपून बसला आहे. भारताने अनेकदा दाऊद पाकिस्तानात असल्याचा पुरावाही दिला आहे. मात्र पाकिस्तान दाऊद आपल्या भुमीवर आहे हे मान्य करायला तयार नाही.

दरम्यान, भारताने सातत्याने दाऊद विरोधात पुरावे सादर केल्यानंतर अमेरिकाने 2003मध्ये दाऊदचा अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे जाहीर केले होते. तसेच संयुक्‍त राष्ट्रानेही दाऊदला दहशतवादी जाहीर करून त्याच्यावर प्रतिबंध लावले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)