दाऊदच्या इमारतीचा 3.51 कोटींना लिलाव

मुंबई – कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या मालकीच्या आणखी एका इमारतीचा गुरूवारी लिलाव झाला. सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने (एसबीयूटी) ती इमारत 3 कोटी 51 लाख रूपयांना विकत घेतली. लिलावात विकली गेलेली दाऊदची चार मजली इमारत दक्षिण मुंबईच्या भेंडी बाजार परिसरात आहे.

लिलावाची संबंधित प्रक्रिया केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आली. एसबीयूटीने याआधीच्या लिलावांत दाऊद आणि त्याच्या कुटूंबीयांच्या मालकीच्या तीन मालमत्ता 11 कोटी 58 लाख रूपयांना खरेदी केल्या होत्या. भारतातून पलायन केलेल्या दाऊदने पाकिस्तानात आश्रय घेतला आहे. मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा तो सूत्रधार आहे. अमेरिकेने त्याला याआधीच जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)