दाऊदची मुंबईतील संपत्ती जप्त करण्याचे आदेश

नवी दिल्ली : दहशतवादी दाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाने सरकारला दिली आहे. दाऊदच्या कुटुंबियांची याचिका फेटाळताना सुप्रीम कोर्टाने हा निर्णय सुनावला आहे.

मुंबईतील नागपाडामध्ये दाऊदची संपत्ती आहे. ही संपत्ती हसीना आणि अमीना यांच्या नावावर आहे. दाऊदने बेकायदेशीरपणे ही संपत्ती गोळा केली होती अशी माहिती तपास यंत्रणांनी दिली होती, त्याआधारे हसीना आणि अमीना यांची याचिका फेटाळण्यात आली आहे. १९९३ साखळी बॉम्बस्फोटानंतर दाऊद देश सोडून पळून गेला होता आणि त्यानंतर संबंधित विभागांनी त्याची संपत्ती जप्त करण्याच्या कारवाईला सुरुवात केली होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)