दाऊदचा खास हस्तक तारिक परवीनला अटक

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा खास हस्तक तारिक परवीनला एका हत्या प्रकरणात ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. तारिक परवीनवर 1998 साली ठाण्यातील मुंब्रा भागात हत्या आणि हत्येचा प्रयत्न या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. मात्र गेल्या 20 वर्षांपासून तारिक या प्रकरणी पोलिसांपासून पळ काढत होता. अखेर ठाणे गुन्हे शाखेने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

डी-गँगचा सर्वात विश्वासू हस्तक म्हणून तारिक परवीनची ओळख आहे. तसेच छोटा शकीलचा उजवा हात म्हणूनही गुन्हेगारी विश्वात तारिक परवीनला ओळखलं जातं. मुंबईत बसून डी-गँगचे सर्व बेकायदेशीर व्यवहार तारिक सांभाळत असे.
ठाणे गुन्हे शाखेने तारिकला 20 वर्षांपूर्वी एका हत्येच्या प्रकरणात अटक केली होती. 2004 साली दुबईहून भारतात आणल्यानंतर तारिकवर त्याच्याविरोधातील अनेक प्रकरणात तो तुरुंगात होता.मात्र काही वर्षातच त्याला जामीन मिळाला आणि त्याची सुटका झाली. आता पुन्हा तारिकला गजाआड करण्यात पोलिस यशस्वी झाले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, जामिनावर सुटल्यानंतर तारिक परवीनने बांधकाम व्यवसायात आपला जम बसवला. खरेतर चर्चा अशी सुरु होती की, बांधकाम व्यवसाय हा दाऊद आणि छोटा शकील यांचाच होता, मात्र तारिक चालवत असे. पोलिसांची गेल्या अनेक दिवसांपासून तारिकवर नजर होती. मात्र त्याच्यावर कारवाईसाठी ठोस माहिती मिळत नव्हती. त्याचवेळी एका खबऱ्याने ठाणे गुन्हे शाखेला मुंब्र्यात झालेल्या एका हत्येची माहिती दिली, ज्या हत्येप्रकरणी तारिक वॉन्टेड होता.

मुंब्र्यात केबल व्यवसायाच्या वादातून दाऊद इब्राहिम बांगडीवाला आणि परवेज अन्सारी अशा दोन व्यक्तींची त्यांच्याच घराबाहेर हत्या करण्यात आली. पोलिस आता तारिक परवीनची चौकशी करणार असून, त्यातून डी-गँगचे काळे कारनामे सुद्धा उघडकीस येण्याची आशा आहे. तसेच, आणखी महत्त्वाची माहिती हाती लागण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)