दाई-ईची कामगार कुटुंबियांचे “बोंब मारो’ आंदोलन

पिंपरी – पुणे-मुंबई महामार्गावरील कासारवाडी येथील दाई-ईची करकरिया कंपनी समोर कामगारांच्या कुटूंबियांनी कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात बोंब मारो आंदोलन केले.

मागील काही दिवसांपासून कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना व कामगार संघटनेला पूर्णत: अंधारात ठेवून अचानकपणे कंपनी गुजरात येथे स्थलांतरीत करण्यास सुरुवात केली आहे. याविरोधात हिंद कामगार संघटनेने न्यायालयाकडून स्थगिती आदेश मिळविला आहे. मात्र, तरीही स्थलांतरण सुरु असल्याने त्याला विरोध दर्शविण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत कंपनी व्यवस्थापन, श्रम मंत्रालय व कामगार आयुक्तांचे लक्ष वेधण्यासाठी मागील त्रेचाळीस दिवसांपासून चक्री उपोषण सुरु आहे. हिंद कामगार संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे अध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली कामगार आपल्या न्याय हक्कांसाठी विविध पातळीवर लढत आहेत.

दिवाळी सुरु झाली तरी कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना नियमानुसार वीस टक्के बोनस, तसेच सर्व कामगारांना पूर्वीप्रमाणे 60 दिवसांची ग्रॅज्यूईटी व जे कामगार 2008 सालानंतर सेवानिवृत्त झालेत त्यांनाही फरकासह ग्रॅज्युईटी मिळावी. या मागण्यांसाठी बोंब मारो आंदोलन करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशाची कंपनी व्यवस्थापनाने अंमलबजावणी करावी तसेच सर्व कामगारांना पूर्वीप्रमाणे 60 दिवसांची ग्रॅज्यूईटी व जे कामगार 2008 सालानंतर सेवानिवृत्त झालेत त्यांनाही फरकासह ग्रॅज्यूईटी मिळावी, 2008 सालापासून प्रलंबित असलेला वेतन करार मार्गी लावावा, कामगारांच्या सर्व सुविधा पूर्वीप्रमाणेच सुरु कराव्यात, कंपनी स्थलांतरीत करण्याचे हे काम त्वरित थांबवावे, आतापर्यंत या कंपनीतून बाहेर पाठविण्यात आलेली मशीनरी पुन्हा कंपनीत आणून उत्पादन सुरु करावे अन्यथा संघटनेच्या वतीने सुरु असलेले चक्री उपोषण आणखी तीव्र करु, असा इशारा कामगार नेते कैलास कदम यांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)