दाई-ईची कामगारांची दिवाळी रस्त्यावर

पिंपरी – सर्व शहर आनंदात असताना कासारवाडी येथील दाई-ईची कामगारांची दिवाळी रस्त्यावरच सुरु आहे. कंपनीच्या स्थलांतरणाविरोधात कामगारांचे गेल्या दीड महिन्यांपासून चक्री उपोषण सुरु आहे.

मागील काही दिवसांपासून कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना व कामगार संघटनेला पूर्णत: अंधारात ठेवून अचानकपणे कंपनी गुजरात येथे स्थलांतरीत करण्यास सुरुवात केली आहे. याविरोधात हिंद कामगार संघटनेने न्यायालयाकडून स्थगिती आदेश मिळविला आहे. मात्र, तरीही स्थलांतरण सुरु असल्याने त्याला विरोध दर्शविण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत कंपनी व्यवस्थापन, श्रम मंत्रालय व कामगार आयुक्तांचे लक्ष वेधण्यासाठी चक्री उपोषण सुरु आहे.

-Ads-

हिंद कामगार संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे अध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली कामगार आपल्या न्याय हक्कांसाठी विविध पातळीवर लढत आहेत. दिवाळी संपत आली तरी कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना नियमानुसार वीस टक्के बोनस दिला नाही. त्यातच ऐन दिवाळीत आंदोलन सुरु असतानाही व्यवस्थापनाने त्याची दखल न घेतल्याने कामगारांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

व्यवस्थापनाने दाखविली बैठकीची तयारी
कंपनी स्थलांतरीत करण्याचे हे काम त्वरित थांबवावे, आतापर्यंत या कंपनीतून बाहेर पाठविण्यात आलेली मशीनरी पुन्हा कंपनीत आणून उत्पादन सुरु करावे या मागणीसाठी ऐन दिवाळीतही कामगारांनी आंदोलन सुरुच ठेवल्याची माहिती कामगार नेते कैलास कदम यांनी दिला आहे. दाई-ईची कंपनी व्यवस्थापनाने चर्चेची तयारी दाखविली आहे. त्यानुसार येत्या आठवडाभरात बैठक होणार आहे. या बैठकीकडून कामगारांना मोठ्‌या अपेक्षा असल्याचेही कैलास कदम यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
1 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)