दहीहंडी, स्वातंत्र्यादिनामुळे फुलांना मागणी वाढली

पिंपरी – श्रावणमास, दहीहंडी व स्वातंत्र्यदिनामुळे फुलांना मागणी वाढली आहे. बाजारात फुलांची आवक कमी व मागणी वाढल्याने भाव वधारले आहेत. कागड्याचा प्रति बंडलच्या भावात 50 रुपयांची घट झाली असून, बाजारबाव 300 रुपयांवर स्थिरावला आहे. याशिवाय श्रावण महिन्यामुळे सत्यानारायण पूजेकरिता केळीची खूंट, बेलाची पाने व फळांना मागणी कायम आहे.

फुलांचे दर प्रतिकिलो व बंडलनुसार पुढीलप्रमाणे-
झेंडू (साधा, पिवळा व कोलकत्ता)- 50 ते 60 रुपये किलो, गुलछडी-100 ते 120 रुपये किलो, लिली बंडल- 8 ते 10 रुपये, जरबेरा बंडल- 80 ते 100 रुपये, गुलाब गड्डी(साधा)- 15 ते 20 रुपये, गुलाब गड्डी (डच)- 100 ते 120 रुपये, अष्टर गड्डी (चार नग)- 15 ते 20 रुपये, अबोली 100 ते 120 रुपये बंडल, जुई बंडल 300 ते 350 रुपये बंडल. किरकोळ बाजारात कागडा गजऱ्याचा भाव प्रति नग 20 रुपये असून, डझनचा भाव 200 रुपयांवर पोचला आहे, अशी माहिती सप्तश्रुंगी पुष्प भांडारचे गणेश आहेर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)