अवसरी – अवसरी बुद्रुक येथे स्व. सुनीलअण्णा हिंगे पाटील (मुंबई पोलीस) दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने रणझुंजार मित्र मंडळच्या माध्यमातून दहीहंडीचा अनावश्‍यक खर्च टाळून गरजू व्यक्तींना मदत करण्यात आली. अपघातामध्ये अपंगत्व आलेल्या प्रकाश चवरे यांना वैद्यकीय उपचारांसाठी सामाजिक जबाबदारी म्हणून दहा हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. या वेळी जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णु हिंगे यांच्या हस्ते ही रक्कम प्रदान करण्यात आली. या वेळी स्व. सुनीलअण्णा दहीहंडी उत्सव समिती आणि रणझुंजार मित्र मंडळाचे सर्व सभासद, कार्यकर्ते, आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)