दहीकाल्याची हंडी तुम्ही फोडा, अत्याचार, भ्रष्टाचाराची हंडी आम्ही फोडणार- देवेंद्र फडणवीस

दहीहंडीसाठी मुख्यमंत्र्यांच्या आगमनाने ठाणे, भिवंडीत गोविंदा पथकांमध्ये उत्साह

ठाणे: दहीहंडीचा उत्सव सर्वत्र लोकप्रिय करणाऱ्या ठाणे शहरातील दहीहंडी उत्सवासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: ठाण्यात आल्यामुळे येथील गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील स्वामी प्रतिष्ठानच्या भव्य दहीहंडीस आज दुपारी त्यांनी भेट दिली व समोरील चैतन्याने सळसळणारी तरुणाई पाहून त्यांनी सुद्धा व्यासपीठावर पुढे येऊन उत्साहाने “भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय’’ अशा घोषणा दिल्या.

आपल्या छोट्याशा संदेशात ते म्हणाले की, प्रभू श्रीकृष्णाचा आशीर्वाद घेऊन तुम्ही दहीकाल्याची ही हंडी फोडा, आम्ही अत्याचार, भ्रष्टाचाराची हंडी फोडू.

 याप्रसंगी खासदार कपील पाटीलआमदार सर्वश्री संजय केळकरगणपत गायकवाडनिरंजन डावखरेप्रसाद लाडशायना एन.सी.जिल्हाधिकारी राजेश नार्वेकरमनपा आयुक्त संजीव जयस्वाल यांची उपस्थिती होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे भिवंडीतील शिवाजी चौकमधील कपील पाटील फाऊंडेशनच्या दहीहंडी उत्सवातही सहभागी झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)