दहिवली येथे काकडा आरती सोहळ्याची सांगता

कार्ला – दहिवली येथील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात मोठ्या भक्‍तीभावाने काकडा आरतीची सांगता झाली. कोजागिरी पौर्णिमेला काकड्याला सुरवात होऊन दररोज पहाटे दही, दूध, साखर, मध, फुले हार व पोषाख घालून सजवत व वेगवेगळ्या अभंगाच्या माध्यमातून परमेश्‍वराची प्रार्थना करण्यात येत होती. संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम, संत जनाबाई, संत नामदेव आदी संताच्या रचना मोठ्या भक्‍तीभावाने गायल्या गेल्या.

कार्तिक पौर्णिमेला ह.भ.प. ऍड. शंकर महाराज शेवाळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता करण्यात आली. मृदुगांची साथ ह. भ. प. भाऊसाहेब आगळमे, संतोष महाराज घनवट, स्वप्नील महाराज पिंगळे, दिपक महाराज मावकर, किसन महाराज मावकर, संतोष महाराज मडके यांनी, तर गायनाचार्य ह. भ. प. गणेश महाराज मोहिते, ह. भ. प. भाऊसाहेब महाराज मावकर यांनी गायनाची साथ दिली. काल्याचे कीर्तनरुपी सेवा झाल्यानंतर आलेले सर्व पाहुणे व ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कीर्तनासाठी गणपत का. येवले, तर महाप्रसादासाठी गंगाराम मावकर यांनी विशेष योगदान दिले.

त्यानंतर संपूर्ण गावात टाळ-मृदुगांच्या तालात दिंडी हार मिरवणूक काढण्यात आली. या वेळी लहान मुले अबाल वृद्ध महिला यांनी या वैष्णवाच्या मेळात तहान भूक हरपून “ज्ञानेश्‍वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम’ असा जयघोष करत फुगड्या खेळत सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे संयोजन पांडूरंग मावकर, भाऊसाहेब मावकर, विष्णू मावकर, शामराव गायकवाड इंद्रायणी तरुण मंडळाचे अध्यक्ष गणेश महाराज मावकर, रामभाऊ मावकर, रामदास पडवळ, शांताराम मावकर, बाळू भि. मावकर, सदाशिव पिंगळे, गणेश जगताप, संतोष मावकर यांच्यासह इंद्रायणी तरुण मंडळ व दहिवली ग्रामस्थ मंडळीने केले होते.
दहिवली : येथे काल्याच्या कीर्तनासाठी जमलेला जनसमुदाय.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)