दहिवली-पडवळवाडी रस्त्याची डागडुजी

दहिवली : पडवळवाडी चिखलमय रस्त्यावर दगड कपची टाकण्यात आली.

कार्ला – दहिवली-पडवळवाडी रस्ता पावसामुळे पूर्णपणे चिखलमय झाल्याने दयनीय अवस्था झाल्याने पडवळवाडी ग्रामस्थांना रस्ता शोधत वाट काढावी लागत होती. प्रशासनाला वेळोवेळी याबाबत सांगण्यात आले; परंतु अजुनही याकडे लक्ष देत नसल्याने पडवळवाडी येथील गुरुप्रसाद अनंता पडवळ यांनी स्वखर्चाने रस्त्याची ढागडुजी करुन घेतली.

दहिवली-वेहरगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील पडवळवाडी रस्ता पूर्णपणे खराब झाला. रस्ता की चिखल हेच कळत नाही. पडवळवाडीकडे जाणाऱ्या ग्रामस्थांना व शाळेत जाणारे विद्यार्थी चिखलातून वाट काढत प्रवास करावा लागत होता. वेळोवेळी याबाबत प्रशासनाला रस्त्याची समस्येबाबत सांगण्यात येत होते. परंतु प्रशासनाने लक्ष न दिल्याने पडवळवाडी येथील गुरुप्रसाद पडवळ यांनी स्वखर्चाने खडी रस्त्यावर टाकून घेतल्याने चिखलात पाय घालवा लागणार नसल्याने पडवळवाडी ग्रामस्थ गुरुप्रसाद पडवळ यांचे आभार मानत आहे.

-Ads-

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)