दहिवडी सोसायटीच्या वार्षिक सभेत गदारोळ

दहिवडी : दहिवडी सोसायटीच्या वार्षिक सभेत संचालकांना प्रश्न विचारताना सभासद.

दहिवडी, दि. 3 (प्रतिनिधी) – दहिवडी विकास सेवा सोसायटीच्या वार्षिक सभेत संचालक मंडळ व सभासदांमध्ये मोठी खडाजंगी झाली. मागील सभेतील अनेक विषय संचालक मंडळांनी मोडीत काढून निर्णय घेतल्याचा आरोप सभासदांनी यावेळी केले आहेत.
वार्षिक सभेच्या वेळी अहवाल न काढताच नकलेची एकच प्रत सभासदांना दिल्याने उत्तमराव इंगळे यांनी संचालकांना जाब विचारत मोठा गदारोळ केला. अनेक वेळा सीसीटीव्ही बसवण्याची मागणी होत असताना काही संचालक याला का विरोध करत आहेत असा देखील त्यांनी यावेळी प्रश्न उपस्थित केला.
जुन्या इमारतीची दुरुस्ती करून भाडे तत्त्वांवर देण्याचा देखील निर्णय घेण्यात आला. तसेच नवीन गाळे काढून भाडेतत्त्वांवर दिले जावेत. जिल्हा बॅंकेच्या खात्यांवर पैसे भरण्यापेक्षा सोसायटीमध्ये पैसे भरून घेतले जावेत असे विषय मंजूर करण्यात आले आहेत. तसेच नऊ टक्‍के लाभांश सभासदंना देण्याचे निर्णय यावेळी अध्यक्ष राजेंद्र खांडे यांनी जाहीर केला व नवीन इमारतीमधील जागा मिलिट्री कॅटीनला भाडेतत्वांवरती देण्यात येणार आहे. आपली संस्था ही सभासदांच्या विश्वासावर चालली आहे. त्याला कसलेही गालबोट लागू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व क्रीडा सभापती ×ऍड. भास्करराव गुंडगे, वाघोजीराव पोळ, तानाजी जाधव, मारुती गलंडे, डॉ. शामराव जाधव, शामराव नाळे, सुरेश इंगळे, अशोक जाधव, शिवाजी जाधव, रवी जाधव संचालक व सभासद उपस्थित होते. प्रास्तविक सचिव अभिजित जाधव यांनी केले तर तुषार जाधव यांनी आभार मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)