दहिवडीत तालुकास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धाचा शुभारंभ

श्रावणी चॅंरिटेबल ट्रस्ट खेळाडुंना सर्व सहकार्य करणार…!
– सौ.सुजाता घोरपडे

बिजवडी – माण तालुक्‍यातील विशेषत: ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे राष्ट्रीय पातळीवर आपल्या खेळातील कौशल्य दाखवण्याची संधी मिळावी ,तसेच त्यांच्या कलांगुणांना वाव मिळावा या हेतूने श्रावणी चॅंरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तालुक्‍यात खेळाडूंसाठी विविध स्पर्धांचे व्यासपीठ तयार करून दिले जाणार आहे. गुणवान खेळाडूंना देशपातळीपर्यंत पोहचवण्यासाठी तसेच त्यांना करियर घडवण्यासाठी ट्रस्ट सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही प्रतिपादन श्रावणी चॅंरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका अध्यक्षा सौ.सुजाता संदीपशेठ घोरपडे यांना केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दहिवडी ता.माण येथील कन्या विद्यालयात जिल्हा क्रीडा विभाग सातारा व रयत संकुल यांच्या संयुक्त विद्दमाने प.म.शिंदे कन्या विद्यालय दहिवडी येथे तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धां आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांच्या उद्‌घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी नगराध्यक्षा सौ.साधना गुंडगे ,जि.प.चे माजी सभापती अँड.भास्करराव गुंडगे ,सिध्दार्थ गुंडगे ,दिनेश दवे ,विकास गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सौ. घोरपडे यांनी ट्रस्टच्या कार्याची माहिती दिली. तसेच भविष्यातील उपक्रमां बद्दल सांगीतले.
विद्यालयाच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.आभार सौ.पवार यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)