दहिवडीत जुगार अड्ड्यावर छापा

13 हजारांचा मुद्देमाल जप्त

गोंदवले – दहिवडी येथे चालणार्‍या जुगार अड्डयावर सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. जुगार खेळणार्‍या 18 जणांना ठिकाणाहून ताब्यात घेतले. त्यांच्यावर दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये, मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियम कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-

या कारवाईत एकूण 13095 रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी दिली आहे. यामध्ये पकडण्यात आलेले आरोपी अक्षय संजय माने, प्रभाकर श्रीरंग जाधव, अनिल रामलिंग तोडकर, विशाल रमेश जाधव, अंकुश मोहन शेळके, दत्तात्रय बाबल्या भोसले, सँडल बंडा काळे व इतर दहाजणांना अटक करण्यात आली. दरम्यान, सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी वडनेर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस उप निरीक्षक गणेश वाघ, पोलीस नाईक रवींद्र बनसोडे, पोलीस शिपाई कृष्णाथ लाड यांच्या पथकाने केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)