दहिवडीच्या मुख्याधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी

दहिवडी : उपोषणाला बसलेले मंगेश खरात, अशोक पवार व भाजपा कार्यकर्ते, नागरिक. (छाया : संदीप जठार)

गोंदवले, दि. 27 (वार्ताहर) – माण तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी सोमवारपासून भाजपचे कार्यकर्ते उपोषणास बसले आहेत. यापैकी एका आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्याला दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दहिवडी नगरपंचायतच्या पंधरा नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मुख्याधिकारी कपिल जगताप यांच्या चौकशीची मागणी केली होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी याची दाखल घेतली नसल्याचे नागरिकांची कोण दाखल घेणार..? असा सवाल आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
अनेक ठिकाणी सिमेंट कॉंक्रीट रस्ते सहा महिन्यातच उखडले आहेत, गटारांवर फरशा टाकून अंडर ग्राउंड गटाराच्या नावाखाली लाखोंच्या निधीचा अपहार केला आहे. विकासनगर मधील घरकुलासाठी आवश्‍यक सोई-सुविधा नाहीत, याठिकाणी अतिक्रमण झाले आहे. पंतप्रधान आवास योजनेसाठी नेमण्यात आलेली एजन्सी विनापावती चलन भरून घेत आहे अशा अनेक व्यवहारांची चौकशी करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. मंगेश खरात, अशोक पवार, दुर्योधन शीलवंत, अभिजित खरात विनायक, राहुल मदने, बंटी खरात, अमोल माने, पिंटू अवघडे व विकासनगरमधील रहिवाशी उपोषणासाठी बसले आहेत.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)