दहिगाव-ने येथील दध्नेश्‍वर पायी दिंडीचा वृक्षसंवर्धन संदेश

पंढरपूरकडे प्रस्थान : भावीनिमगाव येथे दिंडीचे उस्फूर्त स्वागत
भावीनिमगाव – वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी, व टाळ मृदंगाच्या गजरात जय हरी विठ्ठलाचा नामघोष करत दहिगाव-ने येथील दध्नेश्‍वर शिवालयाची आषाढी पायी वारी दिंडी सोहळ्याने दहिगाव-ने येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.
घुले बंधू, कृष्णदेव महाराज काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 17 वर्षापासून सुरू असलेल्या पायी वारी दिंडीने यावर्षी पर्यावरण संरक्षण हेतूने मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड संकल्प करत पंढरपूरकडे मार्गक्रमण केले. सर्वधर्म समभाव शिकवणारी दिंडी आपली सामाजिक जबाबदारी म्हणून वृक्षलागवड व संगोपनाचा संदेश देते. थोरामोठ्यांचे आशीर्वाद व वृक्षवल्ली आम्हा सोयरे हे सार्थ ठरविण्यासाठी या वर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करून वृक्षसंवर्धन करावे, असे मत दिंडी प्रस्थान वेळी वृक्षारोपण कार्यक्रमावेळी बोलताना व्यक्‍त केले.
पांडुरंग महाराज घुले यांच्या प्रेरणेने व परिसराचे वैभव कै. विठ्ठलनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने व कृष्णदेव महाराज काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीचा प्रवास सुरू आहे. परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दिंडीमध्ये सहभागी होतात. यावेळी नरसिंह महाराज मुकुटकर, कृष्णा निकम, नवनाथ काळे, अशोक बोरुडे, श्रीराम चोपडे, ओमकार काशिद, पांडुरंग पानकर, वामन बडे, सीताराम चेडे, नीलेश नेव्हल, झिरपे महाराज, सरपंच सुभाष पवार, उपसरपंच राजाभाऊ पाऊलबुद्धे, साई फाउंडेशन अध्यक्ष डॉ. अरुण पवार, रामकिसन जाधव, रामनाथ राठी, कडूबाळ घुले, शब्बीर शेख, प्रा. मच्छिंद्र पानकर, लक्ष्मण काशिद, बाबासाहेब धुमाळ, सादिक शेख, आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भावीनिमगाव येथील कै. विठ्ठलनाथ महाराज यांच्या आनंद साधकाश्रमात दिंडीचे स्वागत करण्यात आले. यावेळी येथील व्यावसायिक भाऊसाहेब काळे यांचे वतीने अल्पोआहाराची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी सरपंच पांडुरंग मरकड, अशोक थोरात, संजय काळे, गणेश वाकळे मच्छिंद्र चेडे, डॉ. सुरेश कुलकर्णी आदींसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)