दहा हजार रुपयांचे कर्ज मिळवण्याच्या निकषांमध्ये बदल

मुंबई : शेतकऱ्यांना खरीपासाठी 10 हजार रुपयांची मदत देण्याचा जीआर सरकारने काढला. मात्र यातील अटींमुळे लाभधारक कोण ठरतील, असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे सरकारने आता एक पाऊल मागे घेत यातील निकषांमध्ये बदल केले आहेत. कॅबिनेटच्या बैठकीत निकषांबाबत शुद्धीपत्रक काढण्यात आले.
दहा लाखांच्या आतल्या गाड्या आणि शेतीपूरक गाड्या असलेल्यांना मदत दिली जाणार आहे. शिवाय 20 हजार रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांनाही दहा हजार रुपयांचे कर्ज मिळेल, असा निर्णय घेण्यात आला आहे. पंचायत समिती आणि सहकारी संस्थांच्या सदस्यांना या निकषातून वगळण्यात आले आहे. सहकारी संस्थांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष वगळता इतर सदस्यांना कर्ज दिले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)