दहा विद्यापीठांना केंद्राचा 6 कोटी 41 लाखांचा निधी मिळणार

पुणे – राज्यातील दहा विद्यापीठांना राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत नियमित व विशेष शिबीर कार्यक्रम राबविण्यासाठी केंद्र शासनाकडून राज्य शासनाकडे 6 कोटी 41 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. आता हा निधी राज्य शासनाकडून विद्यापीठांना अदा करण्यात येणार असून त्यास शासनाची मान्यताही मिळाली आहे.

केंद्र शासनाने राष्ट्रीय सेवा योजनाअंतर्गत महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये चालू शैक्षणिक वर्षात नियमित कार्यक्रमांसाठी 3 लाख 27 हजार 700 व विशेष शिबीरांसाठी 1 लाख 63 हजार याप्रमाणे विद्यार्थी संख्या मंजूर केलेली आहे. या राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमांसाठी एप्रिल 2016 पासून केंद्र शासनाने 100 टक्के अनुदान देण्यास सुरुवात केल्यामुळे ही योजनाच केंद्रशासित झालेली आहे. विद्यापीठांना राष्ट्रीय सेवा योजनेचे उपक्रम राबविताना होत असलेला खर्च भागविण्यासाठीच केंद्र शासनाकडून विद्यापीठांना निधी अदा करण्यात येत असतो. सन 2010-11 पासून नियमित कार्यक्रम राबविण्यासाठी प्रति विद्यार्थी 250 रुपये व विशेष शिबीराच्या कार्यक्रमांसाठी प्रति विद्यार्थी 450 रुपये याप्रमाणे अनुदानाचे वाटप विद्यापीठांकडून महाविद्यालयांना करण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केंद्र शासनाकडून राज्य शासनाकडे निधी प्राप्त झालेला आहे. आता हा निधी राज्य शासनाकडून विद्यापीठांना अदा करण्यात येणार आहे. यानंतर विद्यापीठामार्फत महाविद्यालयांना निधी अदा करण्यात येणार असून त्यास राज्य शासनाने नुकतीच मान्यता दिलेली आहे. याबाबत राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे राज्य संपर्क अधिकारी व विशेष कार्य अधिकारी डॉ. अतुल साळुंके यांनी आदेशही जारी केले आहेत.

राष्ट्रीय सेवा योजनेअंर्तगत नियमित कार्यक्रम राबविण्यासाठी 3 कोटी 41 लाख 44 हजार 916 रुपये व विशेष शिबीर कार्यक्रमांसाठी 2 कोटी 99 लाख 36 हजार 857 रुपये अशी एकूण 6 कोटी 40 लाख 81 हजार 773 रुपयांच्या अनुदानाचा हप्ता आता राज्यातील दहा विद्यापीठांना वितरीत करण्यात येणार आहे. यात सन 2017-18 या वर्षातील अंतिम हप्त्यापोटीच्या 1 कोटी 28 लाख 57 हजार 20 रुपये निधीचाही समावेश करण्यात आलेला आहे. योजनेतील विद्यार्थी संख्येनुसार हा निधी वाटप होईल.

यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला 1 कोटी 76 काळ 35 हजार 800 रुपये, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला 55 लाख 1 हजार 925 रुपये, पुण्यातील भारती विद्यापीठाला 6 लाख 29 हजार 850 रुपये, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला 9 लाख 49 हजार 779 रुपये, मुंबईच्या तंत्र शिक्षण संचालनालयाला 6 हजार 242 रुपये, नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाला 5 लाख 29 हजार 52 रुपये, नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मस्त्य विज्ञान विद्यापीठाला 3 लाख 70 हजार 500 रुपये, मुंबई विद्यापीठाला 1 कोटी 55 लाख 61 हजार रुपये, नागपूर येथील राष्ट्र संत तुकडोजी महाराज विद्यापीठाला 98 लाख 92 हजार 350 रुपये, लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाला 14 लाख 82 हजार 255 रुपये याप्रमाणे विद्यापीठांना निधी मिळणार आहे. हा निधी विद्यापीठांना चालू शैक्षणिक वर्षातील पहिला हप्ता म्हणून मिळणार आहे.

विद्यापीठांनी सार्वजनिक निधी वितरण प्रणालीद्वारे महाविद्यालयांना निधी वाटप करुन त्याचे विवरणपत्र व उपयोगिता प्रमाणपत्र लेख्यासह सनदी लेखापालाच्या स्वाक्षरीने शासनाकडे सादर करावेत, अशा सूचनाही विद्यापीठांना देण्यात आलेल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)