दहा वर्षात खासदारांनी 7 वेळा वेतन वाढवून घेतले-वरुण गांधी 

नवी दिल्ली: गेल्या दहा वर्षात खासदारांनी आपले वेतन 7 वेळा वाढवून घेतल्याची माहिती भाजपा खासदार वरुण गांधी यांनी दिली आहे. आदर्श महिला कॉलेजमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते. इतर सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन मेहनत आणि इमानदारीने काम करण्याच्या प्रमाणात वाढत असते, मात्र खासदारांनी दहा वर्षात 7 वेऴा केवळ हात वर करून आपले वेतन वाढवून घेतले आहे. जेव्हा खासदारांच्या संपत्तीचे विवरण आणि वेतनवृद्धीचा मुद्दा आपण मांडला, तेव्हा मुद्दा मांडल्यानंतर मला पीएमओ ऑफिसकडून फोन आला होता, की तुम्ही आमच्यापुढील अडचणी वाढवण्याचे काम का करता?
आता पंतप्रधानांनी स्वत:च हा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल आपण त्यांचे आभारी आहोत असे सांगून वरुण गांधी पुढे म्हणाले, की यापुढे खासदारांचे वेतन हात वर करून वाढणार नाही, तर ते संसदीय समिती ठरवणार आहे. खासदारांच्या वेतनवाढीला आपला विरोध नाही, पण ज्यांनी आपली कोट्यवधीची संपत्ती जाहीर केली आहे, त्यांनी वारंवार वेतनवाढ मागावी हे योग्य वाटत नाही. वेतनवाढीसाठी काही तरी प्रमाण पाहिजे, संवैधानिक चौकट असली पाहिजे, जीवनमान आदी मानक विचारात घेतले पाहिजेत.
या प्रसंगी शिक्षणपद्धतीवरही त्यांनी टिप्पणी केली. उत्तर प्रदेशातील शाळांमध्ये शिक्षणाशिवाय बाकी सर्व प्रकारचे कार्यक्रम होतात. तेथे धार्मिक, कार्यक्रम, विवाह सोहळे इतकेच नाही, तर अंतिम संस्कारानंतरचे कार्यक्रमही शाळेत होतात. मुले क्रिकेट खेळतात आणि नेते भाषणे देतात.
दर वर्षी शिक्षणासाठी 3 लाख कोटी रुपये खर्च होतात, पण त्यातील 89 टक्के रक्कम इमारतींवर खर्च होते. इमारती म्हणजे शिक्षण नव्हे, हे त्यांनी अधोरेखित केले. आज देशात साडेपाच लाख शिक्षकांची कमी आहे. सर्व पदव्युत्तरांनी शाळांमध्ये एकेक वर्ष मोफत शिकवले. मोफत शिकवले, तरच भावी पिढीचे कल्याण होणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)