विशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोणे यांचा आदेश

पुणे – दहा वर्षाच्या मुलाशी अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या 24 वर्षीय नातेवाईक तरूणाचा जामीन न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोणे यांनी हा आदेश दिला आहे.
भरत पुंडलिक सुरवसे (वय 24, रा. पटोदा, ता.जि.उस्मानाबाद) असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. याबाबत त्या मुलाच्या आईने दिघी पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना 10 एप्रिल रोजी रात्री 11 ते 11 एप्रिल रोजी सकाळी 7 च्या दरम्यान घडली. फिर्यादी हवेली तालुक्‍यातील चऱ्होली बुद्रुक येथील रहिवाशी आहेत. भरत त्यांच्या घरात पाहुणा म्हणून आला होता. त्याने पीडित मुलाला जवळ झोपण्यास बोलविले. घरातील सर्वजण झोपल्यावर त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 377 (अनैसर्गिक अत्याचार) आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3,4,7 आणि 8 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी भरत याला अटक केली आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. हा गुन्हा विकृत स्वरूपाचा आहे. जामीन मिळाल्यास तो आणखी मुलांसोबत असे कृत्य करण्याची वा पीडित मुलाला धमकाविण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी त्याचा जामीन फेटाळावा, असा युक्तीवाद ऍड. बोंबटकर यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने सुरवसे याचा जामीन फेटाळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)