दहा लाखाची खंडणी घेणारा आरटीआय कार्यकर्ता जेरबंद

माहिती अधिकारात मागवली होती बांधकामाची माहिती

पुणे: बांधकाम व्यवसायीकाकडून दहा लाखाची खंडणी घेणाऱ्या तथाकथीत माहिती अधिकार कार्यकर्ता व त्याच्या मध्यस्थाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. या बांधकाम व्यवसायीकाच्या प्रकल्पाची माहिती महापालिकेकडे माहिती अधिकारात मागवून त्याच्याकडे 20 लाखाची खंडणी मागण्यात आली होती. तडजोडीअंती दहा लाखाची खंडणी घेताना ते पकडले गेले.

-Ads-

आशुतोष घोलप(45,रा.कोथरुड) व अन्य, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी बांधकाम व्यवसायीक प्रशांत अजित अगरवाल(31,रा.खडकी) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी प्रशांत अगरवाल यांच्या वर्धमान असोसिएटस या प्रकल्पाची माहिती रामचंद्र फुगे यांनी माहिती अधिकारात महापालिकेकडे मागितली होती. तर फुगे याने आशुतोष घोलप याच्या मध्यस्थीने माहिती अधिकारावरुन तक्रार मागे घेण्यासाठी फिर्यादीला 20 लाख रुपयांची खंडणी मागीतली होती. तडजोडी अंती दहा लाख रुपये देण्याचे ठरले होते. आरोपींना शनिवारी दहा लाख रुपयांची खंडणी घेताना बालगंधर्व जवळील गंधर्व हॉटेल येथे पकडण्यात आले.

… असे पकडले आरोपी

फिर्यादी अगरवाल यांनी दहा लाख रुपये देण्याची तयारी दर्शवत आरोपींकडे तक्रार मागे घेतल्याची प्रत मागितली होती. यावेळी आरोपींनी पैसे घेऊन आल्यावर तक्रार मागे घेतल्याची हार्ड कॉपी देतो असे सांगितले. यानंतर अगरवाल यांना डेक्कन येथील शुभम हॉटेलमध्ये सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास भेटण्यास सांगितले. दरम्यान अगरवाल यांनी भाऊ विक्रम अगरवाल व मित्र विनय मुंदडा यांच्यासमवेत चर्चा करुन आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देण्याचे ठरवले.

यासंदर्भात तातडीने पोलीस आयुक्त कार्यालयात अर्ज करण्यात आला. तसेच ओळखीच्या माहिती अधिकार कार्यकर्ते रवि बराटे यांना ही हकिकत सांगण्यात आली. त्यांनी यासंदर्भात मार्गदर्शन केल्यानंतर अगरवाल यांनी आरोपींची भेट घेण्याचे ठरवले. त्यानूसार आरोपींची संपर्क साधला असता, त्यांनी 7.40 वाजता गंधर्व हॉटेल येथे येण्यास सांगितले. त्यानूसार अगरवाल हे तेथे प्रथम पोहचले असता त्यांना डेक्कन पोलीस ठाण्यातील ओळखीचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तेथे चहा पित असताना दिसले. त्यांनी तातडीने पोलीसांना घडत असलेल्या घटनेबाबत माहिती दिली. दरम्यान घोलप व फुगे दोघेही हॉटेलमध्ये दाखल झाले. यानंतर घोलप याच्या सांगण्यानूसार त्याला टेबल खालून पैशाचा बंडल देण्यात आला. घोलपने पैशाचा बंडल खिशात टाकताच ओळखीच्या डेक्कन पोलीस ठाण्यातील तीघांनी त्यांना रंगेहाथ पकडले. यानंतर दोघांनाही शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेऊन तक्रार दाखल करण्यात. याप्रकरणाचा पोलीस उपनिरीक्षक एच.एस.गिरी करत आहेत.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)