दहा लाखांचा गुटखा जप्त

पिंपरी – हिंजवडी व चिखली येथील दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये दहा लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पहिल्या कारवाईत हिंजवडी आयटी हबमधील एका गोडावूनमध्ये साठवून ठेवलेला पावणे आठ लाखांचा गुटखा पोलिसांनी छापा मारून जप्त केला. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी ( दि. 13 ) रात्री बाराच्या सुमारास ही कारवाई केली.

-Ads-

या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे संतोष शामराव सावंत (वय-33, रा. पिंपळे गुरव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी समीर युनूस तांबोळी (वय-45, रा. पवारनगर, थेरगाव) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ, उपनिरीक्षक वसंत मुळे कर्मचारी प्रसाद जांगिलवाड, आर. जी. महाडिक, आर. बी भिसे, पी. सी. शेलार, पी. व्ही. गुट्टे यांच्या पथकाने केली.

दुसऱ्या कारवाईमध्ये चिखली येथील आळंदी रस्त्यावर टेम्पोतून वाहतूक होत असणारा 2 लाख 37 हजार गुटखा गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सापळा रचून पकडला. सोमवारी (दि. 12) रात्री नऊच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी टेम्पो चालक सचिन गंगाधर पाटील (वय-28, रा अयोध्यानगर, मालेगाव, जि. नाशिक) याला अटक करण्यात आली आहे. गुटखा वाहतूक होत असणारा एक आयशर टेम्पो देहू आळंदी रस्त्याने आळेफाटा येथे जाणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस कामचारी महेंद्र तातळे यांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून चिखली परिसरात संशयित टेम्पो अडवला. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी रवी जेकटे यांना स्टाफसह बोलावून टेम्पोची तपासणी केली असता आतमध्ये विविध प्रकारचा गुटखा असलेली आठ पोती मिळाली. गुन्हे शाखा, युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, कर्मचारी राजू केदारी, प्रमोद वेताळ, प्रमोद तांडे, अमित गायकवाड, विशाल भोईर यांच्या पथकाने ही कारवाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)