दहा दिवसांनंतर टॅंकरद्वारे केवळ एक बॅलरभर पाणी

  • मोरगाव परिसरातील स्थिती : नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

मोरगाव – बारामती तालुक्‍याच्या ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची मोठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मोरगावसह परिसरातील आठ, दहा गावात टॅंकरद्वारे बॅलरभर पाणी मिळत असल्याने ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. तरडोली येथे तब्बल दहा दिवसांतून गावठाणात टॅंकरचे पाणी आज (रविवारी) आले. मात्र तेही केवळ एक बॅलर मिळाले तर काहींना पाणी न मिळाल्याने ग्रामस्थांकडून तीव्र प्रतिक्रीया व्यक्‍त होत आहेत.
एक बॅलर पाणी आंघोळ, जनावरांना पिण्यासाठी, कपडे धुणे, प्रात:विधी व पिण्यासाठी कसे नियोजन करायचे असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहे. तालुक्‍यातील मोरगाव आंबी बुद्रुक, खुर्द, जोगवडी, तरडोली, लोणी भापकर, लोणी माळवाडी, काऱ्हाटी, बाबुर्डी, जळगाव कडेपठार आदी गावे जेजुरी येथील नाझरे जलाशयावर अवलंबुन आहे. मात्र, नाझरे धरणाने तळ गाठला असल्याने यागावांच्या पाणीपुरवठा योजनांवार परिणाम झाला असूनही प्रशासनामार्फात कुठलीही ठोस उपाययोजन न केल्याने गावागावांतील ग्रामस्थ संपप्त असून ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)