दहा दिवसांत सव्वापाच लाख मुर्तींचे विसर्जन

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला पुणेकरांचा प्रतिसाद : 3,788 मुर्तींचे दान

पुणे : मागील वर्षी प्रमाणेच यंदाही पुणेकरांनी पर्यावरणपूरक गणेशमुर्ती विसर्जनावर भर देत, सामाजिक सलोख्याचे आदर्श असणाऱ्या गणेशोत्सवाच्या जोडीला पर्यावरण संवर्धनाचा आदर्शही घालून दिला. गणेशोत्सवाच्या या दिवसांमध्ये तब्बल 5 लाख 27 हजार 319 गणेशमुर्तींचे विसर्जन झाले असून त्यातील अडीच लाख मुर्तीचे महापालिकेने उभारलेल्या कृत्रिम विसर्जन हौदांमध्ये झाले.

-Ads-

यात 3,788 मुर्तींचे दान करण्यात आले. याशिवाय, या दहा दिवसांमध्ये 673 टन निर्माल्य विसर्जन घाटांवर संकलीत करण्यात आले आल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. तर यंदाही नदीपात्रात 1 लाख 3 हजार गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. तर, हौद आणि घरगुती विसर्जनासाठी महापालिकेने यावर्षी सुमारे 100 टन अमोनियम बायोकार्बोनेट खरेदी केले होते, त्यातील 74 टन विसर्जनासाठी वापरण्यात आले आहे.

महापालिकेकडून गेल्या काही वर्षांत पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागरीक तसेच मंडळांमध्ये जनजागृती केली जात आहे. महापालिकेच्या या मोहीमेला पाठींबा देत मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन महापालिकेच्या हौदांमध्ये केले जाते. त्यामुळे नागरिकांकडूनही महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत हौद, टाक्‍या तसेच घाटांवर उभारण्यात आलेल्या हौदांसह घरगुती मुर्ती विसर्जनावर भर दिला जात आहे.

सव्वापाच लाख मुर्ती विसर्जन
गेल्या दहा दिवसांत शहरातील सुमारे 5 लाख 27 हजार 319 मुर्तीचे विसर्जन केले आहे. त्यात 3 लाख 48 हजार 224 गणेशमुर्तींचे विसर्जन हे दहाव्या दिवशी झाले आहे. महापालिकाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या दिवसांत नदीवरील घाटांवर 55 हजार 690, हौदांमध्ये 1 लाख 19 हजार 072, टाक्‍यांमध्ये 1 लाख 19 हजार 392, नदीपात्रात 1 लाख 3 हजार 675, कॅनॉलमध्ये 1 लाख 9 हजार 873, 2 हजार 981 विहीरीत, 11 हजार 430 तलावात, 113 इतर ठिकाणी तर 5093 एका खासगी कंपनीच्या हौदात विसर्जन केले आहे.

3799 मुर्तींचे दान
शहरात नागरिकांकडून महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत, गणेशमुर्ती दान करण्यावरही भर दिला जात आहे. यावर्षी सुमारे 3,788 मुर्तींचे दान करण्यात आले आहे. मागील वर्षी 2873 मुर्तींचे दान केले होते. ही माहिती पाहता यावर्षी मुर्ती दान करणाऱ्या नागरिकांची संख्या जवळपास 1 हजाराने वाढली आहे. हा आकडा तुलनेने कमी असला तरी, नागरिकांमध्ये महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या जनजागृतीस प्रतिसाद दिला जात असल्याचे समोर आले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)