दहावी विज्ञान पुस्तकात व्याकरण, संकल्पनेबाबत चुका

पुणे, – बालभारतीच्या इयत्ता दहावी विज्ञानाच्या पुस्तकात अनेक स्पेलिंग मिस्टेक असण्याबरोबरच काही संकल्पनाही चुकीच्या असल्याचा आरोप शिक्षक व शिक्षण तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे. दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक या पुस्तकात विद्यार्थ्यांना प्रजनन संस्थेची ओळख करून देण्यात आली आहे. यामध्ये पुरुषांच्या प्रजनन संस्थेची ओळख करून देताना पु:रस्थ ग्रंथीची एक-एक जोडी असते असा आशय पुस्तकातील मजकुरातून प्रतित होतो.

प्रत्यक्षात ते एकच असते. स्त्री प्रजनन संस्थेची ओळख करून देताना कंद-मूत्रमार्ग ग्रंथीची एक जोडी असते असे म्हटले आहे. प्रत्यक्षात ती जोडी स्त्रियांमध्ये नव्हे तर ती पुरुषांमध्ये असते. स्त्रियांमध्ये बार्थोलिन ग्रंथी असतात. त्याचबरोबर काही व्याकरणाच्याही चुका असल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये सौर ऊर्जेविषयी माहिती देताना सोलारचे स्पेलिंग चुकविले आहे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)