दहावी बारावीच्या सर्व उत्तरपत्रिका जमा

आंदोलन मागे घेतल्याने निकालावरचे संकट टळले
पुणे – राज्यातील कनिष्ठ महाविद्यायातील शिक्षकांनी पुकारलेले आंदोलन बहुतांशी मागण्या मान्य झाल्याचे सांगत मागे घेतले असल्याने दहावी व बारावीच्या निकालावरचे संकट आता टळले आहे. पुणे विभागीय शिक्षण मंडळाने 27 एप्रिल ही उत्तरपत्रिका जमा करण्याची शेवटची तारीख दिली होती. त्यानुसार दहावीच्या शंभर टक्‍के तर बारावीच्या 85 टक्‍के उत्तरपत्रिका विभागीय मंडळाकडे जमा झाल्याची माहिती मंडळाचे सचिव बी.के.दहिफळे यांनी दिली.

बारावीच्या उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी आम्ही शेवटची तारीख 27 एप्रिल दिली होती. मात्र कालपर्यंत आमच्या 85 टक्‍के उत्तरपत्रिका जमा झाल्या होत्या उर्वरित शेवटच्या दिवशी होतील. तसेच दहावीच्या विभागीय बोर्डाच्या तीन जिल्ह्यातील सर्व उत्तरपत्रिका आमच्याकडे तपासून जमा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे निकाल हा वेळेतच लागेल.
बी.के.दहिफळे, सचिव
पुणे विभागीय शिक्षण मंडळ

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी शिक्षकांच्या हक्‍कांसाठी पुकारलेल्या आंदोलनातील मागण्या मान्य होण्यासाठी पेपरतपासणीवर बहिष्कार घातला होता. राज्यातून बारावीचे पंधरा लाख तर दहावीचे 17 लाख विद्यार्थ्यांनी पेपर दिलेले होते. बारावीचे पेपर तपासून झाले तरीही ते बोर्डाकडे न पाठविण्याची भूमिका कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनांनी घेतली होती. मात्र अखेर आमच्या बऱ्यापैकी मागण्या मान्य झाल्या असून आंदोलन मागे घेत असल्याचे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यायीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अनिल देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे आता बारावीचा निकाल वेळेत लागणार असून त्यामुळे पुढील दहावीच्या निकालावरील लांबणीचे सावटही दूर झाले आहे.

आमच्या मागण्यांसाठी आम्ही आंदोलन केले होते मात्र ते नुकतेच मागे घेण्यात आले असून राज्यातील जवळपास सर्व उत्तरपत्रिका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी तपासून बोर्डाकडे पाठविल्या आहेत.
अनिल देशमुख, अध्यक्ष
महा.राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघ


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)