दहावी फेरपरीक्षेच्या विद्यार्थ्यांना आयटीआय प्रवेशाची संधी

पुणे – दहावी फेरपरीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या निकालात उत्तीर्ण विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयसाठी अर्ज करता येणार आहे. आयटीआय प्रवेशासाठी दि. 31 ऑगस्ट रोजी समुपदेशन फेरी घेण्यात येणार आहे, असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयने कळविले आहे.

आयटीआयच्या चौथ्या प्रवेश फेरीच्या समाप्तीनंतर रिक्‍त राहिलेल्या जागा संबंधित शासकीय आयटीआय संस्थांना समुपदेशनद्वारे भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. या फेरीसाठी रिक्‍त जागांचा तपशील संचालनालयच्या संकेतस्थळावरील “व्हेकेंट सिट्‌स डिटेल्स’ मध्ये उपलब्ध आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी रिक्‍त असलेल्या आयटीआय संस्थांमध्ये समुपदेशन फेरीद्वारे घेण्यात येणार आहे. दि. 28 ऑगस्ट रोजी समुपदेशन फेरीद्वारे प्रवेश देण्यात आले आहे. या फेरीत प्रवेश मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी दि. 31 ऑगस्ट रोजी समुपदेशन फेरी होणार आहे.

दहावी फेरपरीक्षा निकालात राज्यातील 30 हजार 488 विद्यार्थी उर्त्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी पुणे विभागात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 5 हजार इतकी आहे. या विद्यार्थ्यांना आयटीआय प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. ज्या आयटीआयमध्ये रिक्‍त जागा आहेत, त्याठिकाणी दि. 31 ऑगस्ट रोजी समुपदेशन फेरीतून प्रवेश घेण्याची संधी आहे.

डिप्लोमासाठी एकच दिवस
दहावीनंतरचे तंत्रनिकेतन, थेट द्वितीय वर्षात तंत्रनिकेतन आणि पदविका फार्मसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत उद्या (दि.29) सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे. त्यानंतर दि. 31 ऑगस्ट रोजी जवळच्या सुविधा केंद्रात कागदपत्रांची पडताळणी करून रिक्‍त जागा असलेल्या संस्थांमध्ये जाऊन प्रवेश घ्यावेत, अशी माहिती पुणे विभागीय तंत्रशिक्षणचे सहायक संचालक राजेंद्र गायकवाड यांनी दिली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)