दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै व ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवार, दि. 29 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. तर मूळ गुणपत्रिका जाहीर करण्याची तारीख मंडळाकडून जाहीर करण्यात आलेली नाही.

दहावीची फेरपरीक्षा दि. 18 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आली होती. राज्य मंडळाच्या www.maharesult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील व निकालाच्या माहितीची प्रत प्रिंटआऊट घेता येईल, असे राज्य शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी सांगितले. राज्यभरातून 1 लाख 17 हजार 680 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

फेरपरीक्षेच्या निकालानंतर ज्या विद्यार्थ्यांना गुणाची पडताळणी करावयाची आहे, त्यांनी दि.30 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करावेत. अर्जासोबत ऑनलाईन निकालाची छायांकित प्रत जोडणे अनिवार्य राहील. उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत प्राप्त करावयाची असेल, त्या विद्यार्थ्यांनी दि. 30 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर या कालावधीत विभागीय मंडळाकडे अर्ज करणे आवश्‍यक आहे. अर्जाचा नमूना संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पूनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत घेणे अनिवार्य आहे. छायांकित प्रत मिळाल्याच्या दुसऱ्या दिवसांपासून पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करावेत, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे.
मूळ गुणपत्रिका मिळण्याची तारीख स्वतंत्र कळविण्यात येईल अशी अशी माहिती राज्य मंडळाकडून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)