दहावी परीक्षा अर्ज प्रक्रिया सोमवारपासून

संग्रहित छायाचित्र

पुणे – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च-2019 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास सोमवार दि. 15 ऑक्‍टोबरपासून सुरुवात होणार आहे. दि. 15 ऑक्‍टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची अर्ज सरल डेटाबेस वरूनच ऑनलाइन पद्धतीने भरायच्या आहेत. पुनर्परीक्षार्थी आणि खासगी विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी दि. 6 ते 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मुदत संपल्यानंतर अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विलंब शुल्कासह दि. 17 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत अर्ज करायचा आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)