दहावी आणि बारावी परीक्षा शुल्काचे चलन ऑनलाईन तयार होणार

मुंबई: इयत्ता दहावी आणि बारावीच्या मार्च 2019 मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने सादर केल्यानंतर परीक्षा शुल्काचे एचडीएफसी बॅंकेचे चलन ऑनलाईन तयार होणार आहे. हे चलन विद्यार्थ्यांनी डाऊनलोड करून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे जमा करायचे आहे.

यापूर्वी परीक्षा शुल्क प्रचलित पद्धतीने बँक ऑफ इंडियामध्ये न भरता ते भरणा करण्याबाबतची कार्यवाही बदलण्यात आली आहे. मुंबई विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी त्यांच्याकडे विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्कापोटी जमा होणारी रक्कम माध्यमिक शाळेच्या बँक खात्यामध्ये जमा करणे आवश्यक आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ऑनलाईन चलन डाऊनलोड केल्यानंतर चलनावर नमूद असलेली रक्कम दिलेल्या मुदतीत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी त्यांच्या बँकेच्या खात्यामधून NEFT/RTGS द्वारे चलनावरील नमूद 21 अंकी बँक अकाऊंट व आयएफएससी कोडप्रमाणे मंडळाकडे वर्ग करावयाची आहे. चलनावरील आयएफएससी कोड हा HDFC0000007 असा आहे. परीक्षा शुल्काच्या रकमेबाबत सुधारित पद्धतीप्रमाणे कार्यवाही करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव शरद खंडागळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)