दहावीच्या फेरपरीक्षेनंतर मंगळवारपासून प्रवेश प्रक्रिया,

पुणे – दहावी फेरपरीक्षेचा निकाल चार दिवसांपूर्वी जाहीर झाला. या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची संधी मिळण्यासाठी पुन्हा “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’नुसार परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले. यानुसार येत्या मंगळवारपासून (दि.4) प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

पुणे शहर व पिंपरी-चिंचवड परिसरात अकरावीचे आतापर्यंत 90 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त प्रवेश झाले आहेत. आतापर्यंत एकूण चार नियमित फेरी, एक विशेष फेरी आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य-1 असे एकूण 6 फेऱ्या घेण्यात आल्या आहेत. आता ही सातवी प्रवेश फेरी होत आहे. गट तीननुसार प्रवेशाचे वेळापत्रक ठरविण्यात आले. गट क्रमांक 1 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना 60 ते 100 टक्‍के गुण आहेत, असे विद्यार्थी. गट 2 मध्ये 35 ते 100 टक्‍के, तर गट क्रमांक 3 मध्ये एटीकेटी प्राप्त विद्यार्थी असतील. दरम्यान, दहावी फेरपरीक्षेचा निकाल दि. 29 ऑगस्ट रोजी जाहीर झाला. यात उत्तीर्ण विद्यार्थी, एक अथवा दोन विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थी, अद्यापपर्यंत कोणत्याही फेरीमध्ये प्रवेश न घेतलेले विद्यार्थी, प्रवेश रद्द केलेले विद्यार्थी या सर्वांसाठी ही फेरी घेण्यात येत असल्याचे प्रवेश समितीच्या अध्यक्ष मीनाक्षी राऊत यांनी सांगितले.

प्रवेशाचे वेळापत्रक : “गट एक’


– अर्ज करण्यासाठी मुदत : 4 ते 5 सप्टेंबर
– रिक्‍त जागांचा तपशील : 5 सप्टेंबर रोजी सायं. 7
– प्रवेश निश्‍चितीसाठी कालावधी : दि. 6 ते 7 सप्टेंबर
– गट 2 नुसार प्रवेशप्रक्रिया : 7 ते 8
– गट 3 नुसार प्रवेशप्रक्रिय : 10 ते 11


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)