दहावीच्या पूर्व व्यावसायिक परीक्षेचे शुल्क वीसपट

दुष्काळी स्थिती असताना विद्यार्थी, पालक होरपळले

लोणी काळभोर- राज्यात दुष्काळाचे सावट असल्याने शासन एकीकडे विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याच्या घोषणा करीत आहे. तर दुसरीकडे 10 वी च्या पूर्व व्यावसायिक परीक्षेचे शुल्क 20 रुपये असताना 400 रूपये आकारण्याचा आदेश देते. ही शुल्क वीस पट असल्यामुळे विद्यार्थी, पालक होरपळून गेले आहेत. दरम्यान, या वाढीव शुल्काचे आदेश रद्द करून पूर्वीप्रमाणेच परीक्षा शुल्क आकारले जावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अशासकीय तांत्रिक माध्यमिक शिक्षण कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष एन. ए. जमादार यांनी केली आहे. याबाबतचे पत्र जमादार यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अध्यक्षा अश्‍विनी काळे, सह सचिव डॉ. सुर्वणा खरात, संबंधित मंत्र्यांना दिले आहे.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या पूर्व व्यावसायिक प्रात्यक्षिक परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांकडून 2019 पासून 400 रुपये शुल्क आकारण्यात यावेत, असा आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने सर्व विभागीय मंडळांना दिला आहे. या आदेशामुळे दुष्काळात अगोदरच अडचणीत आलेल्या पालकांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागणार आहे.
ेंया परीक्षेसाठी पूर्व व्यावसायिक विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाते. गतवर्षापर्यंत या अभ्यासक्रमासाठी व्ही-1, व्ही-2, व्ही-3, व्ही-4 या विषयासाठी प्रतीविषय 20 रूपये शुल्क आकारले जात होते. परंतू शिक्षण मंडळाच्या नवीन आदेशानुसार या वर्षापासून प्रतीविषय 400 रूपये शुल्क आकारले जावे, असे शासनाने राज्य मंडळांना कळवले आहे. त्यानुसार मार्च 2019 पासून घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कौशल्य चाचणी शुल्क म्हणून 400 रूपये आकारण्याच्या सूचना राज्य मंडळाने दिल्या आहेत. राज्य मंडळांद्वारे आदेशासोबत संबंधित विषय घेतलेल्या शाळांची यादी विभागीय मंडळाकडे पाठवली आहे. संबंधित शाळांकडून प्रात्यक्षिक शुल्क चलनाद्वारे स्वीकारून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळाकडे पाठवण्याचेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
पालक व विद्यार्थ्याना दिलासा मिळण्यासाठी परीक्षा शुल्कवाढ त्वरित रद्द करावी, याकरीता ही शुल्कवाढ रद्द करण्यात यावी, यासाठी निवेदन दिले. यावेळी बाजारभावाप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यास प्रात्यक्षिक परीक्षेपोटी येणाऱ्या रॉ मटेरीयल खर्चाचा चार्ट देण्यात आला. तसेच फी वाढ कशी कमी करता येऊ शकेल याविषयी चर्चा करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)