दहावीची पुरवणी परीक्षा आजपासून

सव्वालाख विद्यार्थी देणार परीक्षा
पुणे – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेला मंगळवारपासून सुरवात होत आहे. लेखी परीक्षा उद्या दि. 18 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. राज्यभरातून 1 लाख 17 हजार 680 विद्यार्थी या परीक्षेला बसणार असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली.
दहावीच्या नियमित परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जावू नये यासाठी राज्य मंडळामार्फत ऑक्‍टोबर महिन्यात घेण्यात येणारी परीक्षा जुलै-ऑगस्ट महिन्यात घेण्यात येते. पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सप्टेंबर महिन्यात पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येतो. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. यंदा या परीक्षेचे तिसरे वर्ष आहे. तोंडी परीक्षा दि. 10 ते 17 जुलै या कालावधीत घेण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)