नगर – श्रीगोंदे पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी बाळासाहेब उर्फ प्रदीप सुदाम पवार (वय 32) रा. येळपणे ता.श्रीगोंदा हा गेल्या 10 वर्षापासुन पोलीसांना सापडत नव्हता ,मात्र त्याला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे.
श्रीगोंदा पोलीस ठाण्यात त्याच्य्तावर फसवणुकिचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र तो पोलीसांना सापडत नसल्याने. न्यायालयानेही त्याला फरार घोषीत केले होते.
तब्बल 10 वर्षानंतर गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीवरून पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा , अप्पर पोलीस अधिक्षक घनश्याम पाटिल यांच्या सुचनेवरून स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शना खाली सपोनी शरद गोर्डे, कैलास देशमाने, पोसई राजकुमार हिंगोले, श्रीधर गुट्ठे, सुधीर पाटिल , पोहेकॉ. फकिर शेख, उमेश खेडकर, दादासाहेब काकडे, विजयकुमार विटेकर, पोलीस नाईक दिगंबर कारखेले,एम के बनकर, बब्न बेरड आदी गस्ती पथकातील पोलीसांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असतांना या आरोपीला पकडले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा