दहाचा ठोकळा , नको रे बाबा …

पाबळ- पाबळ (ता. शिरूर) येथे आज शुक्रवारी (दि. 19) आठवडे बाजार भरलेला होता; पण या ठिकाणी दहा रुपयांचे नाणे कोणीही स्वीकारयला तयार नसल्याने वादावादीचा कहर झाल्याचे दिसून आले. त्यात ज्यांनी ही नाणी स्वीकारली त्यांचे चेहरे तर आपण खूप मोठा गुन्हा केला असल्यासारखे झाले होते. या कारणामुळे बाजारातील व्यापारी वर्ग मेटाकुटीला आला होता. “दहाचा ठोकळा, नको रे बाबा…’ असाच सूर यामुळे येथे आळवला जात होता.

याबाबतीत बाजारात अनेक गमतीदार प्रसंग घडून हास्याचे फवारेही उडत होते. ज्याला आपले नाणे द्यायचे (कटवायचे) तो पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून बंकेपर्यत ताजी माहिती देण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, ग्रामीण भागाचा एक दंडक आहे,एखादी गोष्ट पक्की झाली की, मागचा पुढचा विचार न करता फक्त “नकार’ द्यायचा. अगदी हाच प्रकार आज आठवडे बाजारात पाहायला मिळाला. यात विशेष करून महिलावर्ग दहाचे नाणे नाकारण्यास ठाम होत्या. त्यामुळे अनेकांची मोठी पंचाईत झाली तर या नोटा कुठून आणायच्या, असा प्रश्न अनेक जण एकमेकांस विचार होते. .
काहींनी महिलांना ,अहो,दहा रुपये बंद नाही झाले ते चालू आहेत असे सांगण्याचा प्रयत्न केला तर उलट उत्तर यायचे मग ते तुमीच ठेवा,एखादा घेण्याचा मन;स्थितीत आला तर हे वझं कुणी सांभाळायच असे उत्तर मिळायचे तर एखादी व्यक्ती ,काल पेपरला आलयं ,दहा रुपये घेतले नाहीतर पोलीस कारवाई करतील असा सांगण्याचा प्रयत्न केला तर व्ह्वू दे अटक झाली तर मात्र ठोकळा घेणार नाही ,नाही तर माल नको असे उत्तर आल्यावर व्यापाऱ्यांची बोलतीच बंद झाली.
यात सगळ्यात मोठा युक्तिवाद बॅंकेबाबत झाला,काहींनी आम्ही घेतले असते पण बॅंका घेत नाहीतकारण त्यांना मोजायला वेळ नाही असे सांगितले त्यावर एक जनाने उसळून सांगेतले कि ,दोन महिन्यापूर्वी त्यांनीच तर दिले शिवाय शंभर शंभर तेही एका वेळी आता का घेत नाही हे विचारा बॅंकेला असा प्रश्न केला आणि बॅंकेशी संपर्क करण्यात आला.त्यामुळे या अफवेची पार्श्वभूमी कळली आणि ठोकळे बंद झाले नाही याची माहिती बॅंकेने दिली.आणि जागृती करा अशी माहिती दिली.चौकट : शिरूर भागातील एका बॅंकेत इतकी नाणी गोळा झाली कि नोटा ठेवायला जागा राहिली नाही त्यामुळे त्या बॅंकेने काही दिवस नाणी स्वीकारायची बंद केली.त्याचा परिणाम दहाची नाणी बंद झाली या अफवेत झाला ,त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात इतरबंकेत नाणी जमा करण्याचा सपाटा लावला त्यामुळे लाईनीत उभे राहणाऱ्याना रोख रक्कमा मिळण्यास उशीर होऊ लागला त्यामुळे त्या बंकानीही नाणी स्वीकारताना हात आखडता घेतला आणि अफवा पक्की झाली ती दहा रुपयाची नाणी बंद झाल्याची . यावर आता नागरिकांनी शंभर किंवा पन्नास रुपयाचे पाउच करून पैसे भरल्यास बॅंक नाणी स्वीकारतील अशी माहिती पाबळ महाबंकेचे व्यवस्थापक म्हाताम्बरेकर यांनी दिली.शिवाय बंद झाल्यास बॅंकेकडून जाहीर होत असते तसे काही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)