दहशत माजवणे पॅशन, फॅशन

  • चाकण परिसरातील धक्कादायक वास्तव : अल्पवयीन मुलांचा सर्वाधिक समावेश

चाकण – गेल्या काही महिन्यापासून चाकण व परिसारत सातत्याने घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन भयग्रस्त झाले आहे. तर कायदा व सुव्यवस्थेची पायमल्ली होत असल्याचे वास्तववादी भयानक चित्र दिवसेंदिवस गडद होत राअहे. तसेच दहशत माजविण्यासाठी अल्पवयीन मुलांच्या टोळळ्या कार्यरत असून त्यांना दहशत माजवणे म्हणजे पॅशन आणि फॅशन वाटू लागली आहे.
खेड तालुक्‍याच्या चाकण, नाणेकरवाडी, खराबवाडी, महाळूंगे, आंबेठाण, सावरदरी, वासुली या भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती वाढत आहे. त्यामुळे जमिनीचे भाव गगनला भिडले असून जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहारही मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत, त्याचा फायदा घेण्यासाठी इस्टेट एजंटची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या क्षेत्रात कमी श्रमात अधिक पैसा मिळत असल्याने तरूण वर्गाची पाऊले नकळतपणे त्यात गुंतू लागली. हा व्यवसाय करीत असताना अनेक गैरप्रकार घडले, घडत आहेत. यामुळे आपसातील वैमनस्यही मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने गुन्हेगारीचा आलेख उंचवण्यात एक प्रकारे मदत करत आहेत. या औद्योगिक वसाहतीत कामाचे ठेके मिळावे म्हणून आणि आपले वर्चस्व राहावे म्हणून तरुण पिढी या मार्गाकडे मोठ्या संख्येने वळत आहे. त्याचाही परिणाम सामाजिक शांतता बिघडण्यावर होत आहे. किरकोळ, गंभीर कारणावरून खून प्रकरण आणि अशा घटना सातत्याने सुरु आहेत. या शिवाय दहशत माजविण्यासाठी अल्पवयीन मुलांच्या टोळक्‍यांकडून अवैध हत्यारांचा वापर करणे ही आजच्या युगातील पॅशन आणि फॅशन झाली असून टोळीयुद्ध, गेम वाजविणे, ठोकणे, टाकणे, घोडा, लांबडी, कट्टा, कोयता, चॉपर या गुन्हेगारी विश्‍वातील शब्दांचा वापर आजच्या तरुणाईत सर्रास होत आहे.

  • …त्यामुळे आयतेच खतपाणी
    सहज उपलब्ध होणारा मुबलक पैसा, ईर्षा यामुळे अवैध हत्यार खरेदी करण्याकडे युवकांचा कल वाढू लागला आहे. त्यामुळेच गावठी कट्ट्यापासून ते आधुनिक पिस्तुल जवळ बाळगण्या पर्यंत युवकांची मजल पोहोचली आहे. कायद्याची भीती, पोलिसांचा वचक आदी गोष्टी इतिहासजमा (?) झाल्याने गुन्हेगारी वृत्तीला आयतेच खतपाणी मिळत असल्याचे वास्तव काही घटनामुळे समोर आले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)