दहशत माजवणाऱ्या टोळीतील आठ जणांना बेड्या

लवासा परिसरात आर्थिक साम्रज्य उभा करण्याचा प्रयत्न

पिरंगुट- लवासा परिसरात दहशत निर्माण करून आर्थिक साम्राज्य उभे करू पाहणाऱ्या गुंडांच्या 12 जणांच्या टोळीतील म्होरक्‍यासह आठ जणांना जेरबंद करण्यात पौड पोलिसांना यश आले आहे. तर या टोळीतील फारर असलेल्या चौघांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर अटक करण्यात आलेल्या आठही आरोपींना मंगळवार (दि. 26) दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.

म्होरक्‍या समीर पासलकर, सागर शिंदे, अमोल शेडगे, अजय शेडगे, चिवड्या उर्फ आकाश शेडगे, पप्पू पोळेकर, विनोद जाधव, विजय जाधव असे कोठडी सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. तर रामदास कोंडीबा मरगळे यांनी फिर्याद दिली. याबबतची माहिती अशी की, रामदास मरगळे हा त्याचा चुलत भाऊ गिरीश मरगळे यांच्या लवासा परिसरातील दासवे गावच्या हद्दीत असलेल्या हॉटेल आशीर्वादमध्ये वेटर म्हणून काम करतात. नेहमी प्रमाणे ते गुरुवारी (दि. 21) कामावर आलेला असताना रात्री 9.30 च्या सुमारास सागर शिंदे व समीर पासलकर यांनी त्यांच्या अन्य साथीदारांनी हॉटेल बाहेर ओढत नेले व तू दत्ता उघडे कोठे आहे हे सांग अशी दमदाटी करून त्यांच्या हातात असलेल्या तलवार, कोयता व लाकडी दांडक्‍याने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मोठ्या संख्येने नागरिक जमा झाल्याने आरोपी चारचाकी व दुचाकीवरून पसार झाले होते. तर तक्रार दाखल होताच पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून आरोपना अटक केली. पुढील तपास पौड पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक धुमाळ करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)